कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच; महाविद्यालयीन तरुणाला ‘थार’ने उडवलं, अपहरणाचा प्रयत्न, Video

कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच; महाविद्यालयीन तरुणाला ‘थार’ने उडवलं, अपहरणाचा प्रयत्न, Video

कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, परप्रांतीय व्यक्तींकडून यापूर्वी मराठी माणसांना मारहाण झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेला एका परप्रांतीय तरुणाकडून मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेव्हा हा प्रयत्न फसला तेव्हा त्याचं अपहरण करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र स्थानिक लोकांनी वेळीच धाव घेतल्यानं हा प्रयत्न फसला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये परप्रांतीय लोकांची दादागिरी वाढतच असल्याचं दिसून येत आहे.    डोंबिवलीमध्ये मराठी भाषा प्रकरणी अपशब्द वापरल्या नंतर इमारतीत जोरदार राडा झाला होता, याप्रकरणी आज गुन्हा दाखल झाला असून कारवाई सुरू असतानाच पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवली परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

कल्याणच्या लोकग्राम परिसरात एका परप्रांतीय तरुणाने मराठी विद्यार्थ्यावर थार गाडी चढवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याचं अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला.  मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्लोक सावंत असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे तर सुयश तिवारी असं हल्ला व अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना श्लोक सावंत याच्या आईने म्हटलं की “आम्ही मराठी महाराष्ट्रात सुरक्षित नाही तर कुठे सुरक्षित राहणार” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान  सध्या हा वाद नेमका कशाचा आहे? याचा तपास कल्याण कोळशेवाडी पोलीस करत आहेत.  याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;