Sanjay Raut : कोणताच फैसला होणार नाही, उलट भाजप…वाल्मिक कराड विषयी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut : कोणताच फैसला होणार नाही, उलट भाजप…वाल्मिक कराड विषयी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोक्कातील आरोपी वाल्मिक कराड याच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला. कराडला देण्यात येणाऱ्या खास सरकारी पाहुणचाराचा त्यांनी एकसाथ समाचार घेतला. त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या या आरोपांमुळे आता वादाची ठिणगी पडली आहे. तर एकूणच तपासावर सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्याय व्यवस्था दबावाखाली

न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. त्याचा संदर्भ घेत राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या कामकाजावर आणि वेळकाढू धोरणावर पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त केली. ते मैदानावर खेळत राहिले. चेंडू रगडत राहिले. पण त्यांनी विकेट घेतली नाही, असे ते म्हणाले. शिवसेना कुणाची यावरून निकालाच्या विलंबावर त्यांनी संताप व्यक्त केला.

कोणताच फैसला होणार नाही

मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आज फैसला होणार की नाही, याविषयावर त्यांनी भाष्य केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आहे. बीडमधील दहशतवादाविरोधात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर तांडव केले आहे. पण कोणताच फैसला होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

वाल्मिक कराड हे इस्पितळात आहेत. त्यांचे कुठे काय दुखतं हे माहिती नाही, तरी ही ते इस्पितळात आहेत. त्यांच्यासाठी रुग्णालयाचा एक मजला रिकामा करण्यात आला आहे. इतर अनेक सोयी-सवलती त्यांना मिळत आहे, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? असा सवाल राऊतांनी केला. अजित पवार यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केल्याचे आणि या गोष्टी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

वाल्मिक कराड भाजपाच्या गोटात

सुरेश धस यांनी तांडव केला आहे. अंजली दमानिया या भाजपाशी, संघाशी संबंधित आहेत. याप्रकरणात काही फैसला होणार यात कोणी पडू नये, काहीच फैसला होणार नाही, असे ते म्हणाले. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपाच्याच गटात बसलेली असतील, असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;