शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरणाने खळबळ, गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरणाने खळबळ, गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक राहिलेले अशोक धोडी हे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाकडून अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबाकडून या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार  घोलवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसापासून अशोक धोडी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्यानुसार घोलवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मदतीनं अशोक धोडी यांचा शोध घेतला जात आहे. झाई बोरीगाव मार्गावरून ज्या ठिकाणीहून अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने जंगलामध्ये शोध घेतला जात असून, ड्रोनच्या साह्याने जंगलामध्ये पाहणी केली जात आहे.

या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला आहे. ज्या ठिकाणावरून अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, त्या ठिकाणाचा संपूर्ण आढावा बाळासाहेब पाटील यांनी घेतला आहे. शिवाय त्याठिकाणी ड्रोनच्या मदतीनं जंगलामध्ये देखील शोध घेतला जात आहे. तपास सुरू आहे, संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, लवकरच आम्ही अशोक धोडी यांचा शोध घेऊ अशी प्रतिक्रिया यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी अशोक धोडी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. मी आणि पक्ष आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, पोलीस लवकरात लवकर धोडी यांचा शोध घेतील असं संख्ये यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांशी देखील चर्चा केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;