अजित पवारांकडून अखेर दखल… अंजली दमानिया यांना भेटायला बोलावलं; मोठ्या घडामोडींची शक्यता

अजित पवारांकडून अखेर दखल… अंजली दमानिया यांना भेटायला बोलावलं; मोठ्या घडामोडींची शक्यता

मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अखेर अजित पवारांनी अंजली दमानिया यांना भेटीसाठी बोलावलं आहे. थोड्याच वेळात अंजली दमानिया आणि अजित पवार यांची भेट होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, संतापाची लाट आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानं वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते.

नेमकं काय म्हणाल्या होत्या दमानिया? 

मी यासंदर्भात आधीच ट्विट केलं होतं, मी जेव्हा त्याचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्याला काहीही झालं नसल्याचं दिसून आलं तो ठणठणीत बरा आहे. मग त्याची केवळ बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं का? त्याच्यामुळे आकरा रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले. या प्रकरणात त्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालावर देखील संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल योग्य दिला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान अजंली दमानिया यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अजित पवार यांनी आता दमानिया यांना भेटीसाठी वेळ दिला आहे. थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;