वाल्मिक कराड प्रकरणात नवं ट्विस्ट, अजंली दमानियांचा ‘त्या’ डॉक्टरांबाबत मोठा गौप्यस्फोट

वाल्मिक कराड प्रकरणात नवं ट्विस्ट, अजंली दमानियांचा ‘त्या’ डॉक्टरांबाबत मोठा गौप्यस्फोट

वाल्मिक कराड याची तब्येत खालावल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते.  या संदर्भात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पण मी ट्विट केलं होतं, आणि काल जेव्हा मी त्याच्या रिपोर्टची माहिती घेतली तर त्या रिपोर्टसमध्ये त्याला काहीही झालं नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट देखील व्यवस्थित आहेत.

फक्त अँटिबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो,  आणि त्याच्या सिटीस्कॅनमध्ये देखील काही आलेलं नाही, यावरून आपल्याला कळतंय की त्याची फक्त बर्दास्त ठेवण्यासाठीच त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याच्यासाठी 11 रुग्णांना आपले बेड खाली करावे लागले.  ज्या व्यक्तीला काहीच झालं नाही, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येतं, आणि त्याच्यासाठी आकारा जण आपला बेड खाली करतात तर हे चुकीचं आहे. या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

दरम्यान सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत देखील दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. अशोक थोरात जे आताचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा मला असं कळालं की ते राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभेची पण निवडणूक लढवायची होती आणि विधानसभेची निवडणूक पण लढवायची होती. त्यांची आधी नाशिकला ट्र्न्सफर झाली मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या व्यक्तीबद्दल जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती मिळाली, आंबेजोगाई येथे एक पियुष इन नावाचे अतिशय सुपर लक्झरी असं हॉटेल आहे, त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला आहे, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;