उपोषणावर दादा भुसेंची प्रतिक्रिया, म्हणाले जरांगे पाटलांना विनंती…

उपोषणावर दादा भुसेंची प्रतिक्रिया, म्हणाले जरांगे पाटलांना विनंती…

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाला मंजुरी देखील दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.  यावर आता शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दादा भुसे? 

जरांगे पाटलांना विनंती आहे, आवाहन करतो गोरगरिबांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची देखील पूर्वीपासूनची भूमिका आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मराठा समाजासाठी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन प्रलंबित आहे, त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वेक्षण करून मराठा समाजात जे मागासलेले अनेक गोरगरीब बांधव आहेत, त्यांना शौक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात आरक्षण देण्याची भूमिका आहे. हा संपूर्ण अहवाल आपण मांडायला घेत आहोत आणि या सर्व गोष्टी प्रगतीपथावर आहेत, असं भुसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील. त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमचं काम जबाबदारी आहे, असं भुसे यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, यावर देखील दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, ते जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत, यावरून भुसे यांनी त्यांना टोला लगावला आहे. तो त्यांचा विषय आहे. एकेकाळी आमदारांची संख्या किती होती? ती आता कितीवर आली आहे? खासदारांची संख्या 18- 20 होती की आठवर आली आहे, त्याचे चिंतन उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे, असं भुसे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;