CCTV मध्ये शरीफुल की इतर कोणी? सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटणार कशी? हे तंत्रज्ञान करेल उलगडा

CCTV मध्ये शरीफुल की इतर कोणी? सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटणार कशी? हे तंत्रज्ञान करेल उलगडा

सैफ अली खानवर घरात घुसून 16 जानेवारी रोजी भल्या पहाटे हल्ला करण्यात आला होता. त्या चोराला पोलिसांनी मोठं कोम्बिंग ऑपरेशन करून बेड्या ठोकल्या. पण तो हा नव्हेच, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम (Mohammad Shariful Islam) आणि सीसीटीव्हीतील आरोपी यांची चेहरापट्टी जुळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपीच्या वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाला अडकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या शंका कुशंकाना विराम देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

हल्लेखोराची अशी पटवणार ओळख?

एका माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याच्या बाईकचा नोंदणी क्रमांक नोंदवला होता. आता आरोपीचा चेहरा ओळखण्यासाठी पोलीस चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा (Face Recognition Technology) वापर करणार आहेत. तपासा दरम्यान आरोपी हा दादर रेल्वे स्टेशनबाहेर तीन ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला होता. हल्लेखोर याच परिसरात एका मजूराला सुद्धा भेटायला गेला होता.

Face Recognition तंत्रज्ञान आहे तरी काय?

फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी हे बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. हे तंत्रज्ञान चेहऱ्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटवते. याला बायोमॅट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बेस ॲप्लिकेशन असे म्हणतात. कोणताही फोटो-व्हिडिओ वा रिअल टाईममधील लोकांची ओळख पटवण्यासाठी फेशियल रिकग्निशन सिस्टमचा वापर करण्यात येतो.

फेस रिकग्निशन टेक्नोलॉजीचा फायदा

या तंत्रज्ञानामुळे विना कोणता संपर्क करता लोकांची ओळख पटवता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर कर्मचार्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर आरोपी, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी करण्यात येते.

हे तंत्रज्ञान अल्गोरिदम तंत्रावर काम करते. यामध्ये चेहरा पट्टीवरून व्यक्तीची ओळख पटते. हे तंत्रज्ञान फेस डाटा पाहते. जमा केलेल्या डाटावरून नंतर चेहर्‍याची ओळख पटते. स्मार्टफोन, कॅमेरा आणि सिस्टिमचा वापर या तंत्रज्ञानासाठी करण्यात येतो. आता आरोपीचा चेहरा ओळखण्यासाठी पोलीस चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. तपासा दरम्यान आरोपी हा दादर रेल्वे स्टेशनबाहेर तीन ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला होता.  आता सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;