‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता , दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या 54 कंपन्यांपैकी फक्त 11 कंपन्या या बाहेरच्या आहेत. 43 कंपन्या या भारतीय आहेत, 43 पैकी 33 कंपन्या तर महाराष्ट्रातीलच आहेत. डावोसमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येतात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. एमएमआरडीए आणि सिडकोनं 4 लाख करार केलेले होते.  नगरविकास मंत्री शिंदे गावाला आणि फडणवीस डावोसाला होते. शिंदेंवर अन्याय झालेला आहे, त्यांची नाराजी पाहायला मिळते. काही एमओयू बिल्डरसोबत केलेले आहेत. नगरविकास खातं डावोसला पण मंत्री गावाला होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उदय सामंतांच्या दाव्यानं चर्चेला उधाण 

दरम्यान शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच फुटणार होती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या या दाव्याला शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर दावोसमधून उदय सामंत यांनी देखील असाच दावा केला. शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असून, पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;