मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार ?अंजली दमानिया यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार ?अंजली दमानिया यांचं वक्तव्य

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात तपास संपल्याचे सांगितल्याने न्यायालयाने सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड याच्या सह सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या आरोपींना आता अगदी राजा महाराजासारखी ट्रीटमेंट मिळालयला ते आता मोकळे झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात आरोपींना कालच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या आरोपींना न्यायालयाच्या देखरेखी खाली पोलिसांना त्यांची रोज चौकशी करावी लागणार आहे. या संदर्भात हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात न्यायालयीन कोठडी इतक्या लवकर दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की पीडित संतोष देखमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक व्हिडीओ आपल्याला पाठवला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला खूप राग आला आहे. आपली सिस्टीम इतकी सडली आहे. पोलीस प्रशासन काम करीत नाहीए.

धनंजय देशमुख यांनी मला एक रात्री व्हिडिओ पाठवला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला इतका राग आलाय आपली सिस्टीम किती सडले की कोणीच काम करत नाहीयेत… पोलीस प्रशासन कोणीच काम करत नाहीये. आरोपी कुठे गेले होते. याची माहिती सीसीटीव्हीत कैद झाल्याची ही माहिती आहे. या व्हिडिओचा उल्लेख देखील पीसीआरमध्ये नाही असाही त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे.

या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहीलेले नाही

पोलीसांनी तपास संपला म्हणून सांगितलं नंतर न्यायालयाने त्या महाशयांना न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहीलेले नाही. ते राजा महाराजा नाहीत गुन्हेगार आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. सर्वांना पत्र लिहून देखील त्यांचा वरदहस्त संपत नाही. हे सर्व पाहून माझे डोके दुखत आहे. पोलिसांना आणि इतरांना काही कळत नाही. सगळ्यांना सर्व माहिती आहे की हा सराईत गुंड आहे. कसे बीडला लुटले कशी संपत्ती मिळविली सर्वांना माहिती आहे.

भुजबळ यांना कशी कळ यायची ?

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता वैद्यकीय कारणाखाली जामीनावर जायचे आहे. भुजबळांना कशी जेलमध्ये असताना छातीत कळ यायची. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतील एसीमध्ये बसवतील आणि लोक येऊन त्यांना भेटतील याचीच भीती होती मला आणि हळूहळू मेडिकल बेल मिळण्याची भीती होती तसेच होणार असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने स्ट्राँग भूमिका घ्यावी यासाठी मी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीले आहे. फडणवीस आणि अजित दादांकडून न्याय मिळेल असं वाटत नाही… सगळ्यांनी एक ट्वीट केल पाहिजे..धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पाहिजे. ते आमदार म्हणून राहूच शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार, ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, भ्रष्टाचारात बुडाले आहेत असेही त्या म्हणाल्या.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;