निष्ठा एकच, पण मेळावे दोन, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे अंधेरीत तर शिंदे गटाच बीकेसीवर अभिवादन

निष्ठा एकच, पण मेळावे दोन, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे अंधेरीत तर शिंदे गटाच बीकेसीवर अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली. या पक्षाचे सरकार सत्तेत आणले. पुढे अनेक वादळे शिवसेनेने झेलली. 2019 नंतर शिवसेनेने भूमिका घेत महाविकास आघडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर एकनाथ शिंदे यांनी बंड करत वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता एक शिवसेना सत्ताधाऱ्यांसोबत तर दुसरी सेना ही विरोधी खेम्यात एकमेकांविरोधात दंड थोपटून आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुंबईतच नाही तर राज्यभर त्यांना दोन्ही शिवसेनेकडून अभिवादन करण्यात येत आहे.

निष्ठा एक, मेळावे दोन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत दोन शिवसेनेचे मेळावे होत आहे. एक अंधेरीत तर दुसरा बीकेसी मध्ये मेळावा होत आहे. बीकेसीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. मोठं असं व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. असंख्य खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. मोठमोठे कट आउट देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या कट आउट मध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट आऊट लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण वातावरण हे भगवामय पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सुप्रसिद्ध गायक सोनू निगम तसेच अवधूत गुप्ते यांच्या संगीताची मैफिल देखील रंगणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे.

बातमी अपडेट होत आहे…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;