पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, गोगावलेंचे तटकरेंवर गंभीर आरोप

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, गोगावलेंचे तटकरेंवर गंभीर आरोप

पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते पुन्हा एकदा आपल्या मुळ गावी दरे इथे गेले होते. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे नेते देखील नाराज असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे नाराज झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. मात्र आधी पालकमंत्री म्हणून ज्यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, तेच या वेळी 26 जानेवारीला ध्वजारोहन करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले असल्याची बातमी समोर येत आहे. जोपर्यंत भरत गोगावले हे पालकमंत्री होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. राज्यात कोणतच सीट निवडून आलं नाही, मात्र रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं. आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुनील तटकरे निवडून आले, मात्र त्यांनी तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोगावले यांनी केला आहे,  गोगावले यांच्या आरोपांनंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे नाराज असल्याची चर्चा 

पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र त्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे इथे गेले होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;