‘भलेही दोन सामने गमावले पण आता पुढची मॅच ठाण्यात…’, संजय राऊतांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं

‘भलेही दोन सामने गमावले पण आता पुढची मॅच ठाण्यात…’, संजय राऊतांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. अभिनेता सैफ अली खानवर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील हल्लेखोराला पोलिसांनी अखेर आज अटक केलं हा धागा पकडून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते ठाण्यात बोलत होते.

आज शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ मैदानात हिंदूहृदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी आज संजय राऊत हे ठाण्यामध्ये आले होते. त्यांनी शक्तिस्थळ येथे जाऊन आनंद दिघे यांचं दर्शन देखील घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्याच्यावर जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

समुद्रात बुडणाऱ्या त्या बोटीमधील 35 जणांचे प्राण आसिफ यांनी वाचवले, दुसरीकडे   दुसऱ्या चोराला पकडणारा चेतन चौधरी आमचा शाखाप्रमुख आहे. सैफ अली खान यांच्या   घरी चोरी करणारा चोर देखील ठाण्यात पकडला. ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. आता पुढील मॅच ठाण्यात जिंकायची आहे. भलेही आम्ही दोन सामने गमावले असले तरी तिसरी मॅच महापालिकेची आम्हीच जिंकणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे संकेत

दरम्यान लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संकेत दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना तयारील लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे आता लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;