संतोष देशमुख हत्याप्रकरण ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, इम्तियाज जलील पहिल्यांदाच बोलले, केली मोठी मागणी

संतोष देशमुख हत्याप्रकरण ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, इम्तियाज जलील पहिल्यांदाच बोलले, केली मोठी मागणी

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता पहिल्यांदाच एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत, आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील? 

ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत, आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा  आणि लवकरात लवकर जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्या. महाराष्ट्रासमोर हे एक उदाहरण ठेवा, जर पुन्हा कोणी असं केलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही.  आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बीडचं पालकमंत्रिपद यावेळी धनंजय मुंडे यांना न देता अजित पवार यांना देण्यात आलं आहे. यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  पॉलिटिकली खूप चांगला गेम त्यांनी खेळला आहे, अजित पवार यांना माहित आहे की पुण्याचंही पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि आता बीडचंही. याचा अर्थ आहे की फक्त कागदावरच ते पालकमंत्री असणार आहेत, आणि प्रत्यक्षात बीडचा पालकमंत्री म्हणून दुसरंच कोणीतरी काम करेल असं जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते, वाळू माफी असेल अजून एखादी माफी असेल, प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी सरकारचं संरक्षण असल्याचं दिसतं असा टोला यावेळी जलील यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;