मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाण्यातील समुद्राखालील बोगद्याची रेल्वेमंत्रीकडून पाहणी, प्रथमच आले फोटो
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनचे काम ठाण्यात सुरु आहे. ठाण्याजवळ भारतातल्या पहिल्या २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत आहे. त्यातील सात किलोमीटर बोगदा समुद्राखालीन आहे. या बोगद्याच्या कामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली.
गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा ट्रायल 2026 मध्ये सूरत-बिलिमोरा दरम्यान होण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुंबई, ठाणे, सुरत, अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये अर्थव्यवस्था गती घेईल.
मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात बोगद्याचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिलफाटा दरम्यान 21 किलोमीटरचे होत आहे. 16 किलोमीटर टनल बोरिंग मशीनद्वारे केले जात आहे. तसेच 5 किलोमीटर एनएटीएममाध्यमातून केले जात आहे. ठाणे क्रीकवर 7 किलोमीटरचा बोगदा समुद्राखाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List