एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार

मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरू आहेत. आता आणखी एक मोठा धक्का नाशिकमध्ये बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आणि उपनेते विजय करंजकर यांची देखील उपस्थिती होती. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी ठाकरे गटाच्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि दिंडोरीमधील अंदाजे दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी  आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी नाशिकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकत आता आणखी वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. तर महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीच्या राज्यात 232 जागा निवडून आल्या मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. 132 जागा जिंकत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेनेला देखील निवडणुकीत चांगलं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी हे शिवसेनेते प्रवेश करताना दिसत आहेत. याचा मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो.

अजितदादांचाही धक्का   

दरम्यान दुसरीकडे महायुतीचा दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धक्का दिला आहे. परभणी , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;