संक्रांतवर संक्रात… वाल्मिक कराडला चोहोबाजूने ‘धस’का; कोर्टात आणि दिवसभरात काय काय घडलं?

संक्रांतवर संक्रात… वाल्मिक कराडला चोहोबाजूने ‘धस’का; कोर्टात आणि दिवसभरात काय काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात यापूर्वी आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नव्हता. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात यावा अशी मागणी देशमुख यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली होती. अखरे आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.

दिवसभरात नेमकं काय घडलं? 

आज वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं त्याला खंडणीप्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे, कोर्टानं वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी एसआयटीला दिली आहे. आता उद्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे परळीमध्ये वाल्मिक कराड याचे समर्थक आज सकाळपासूनच रस्त्त्यावर उतरले आहेत. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाला भोवळ देखील आल्याची घटना घडली. वाल्मिक कराडच्या आईनं देखील आज परळीमध्ये ठिय्या आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची बातमी समोर येताच परळीमध्ये समर्थकांकडून बंदची हाक देण्यात आली.

परळीमध्ये सर्वत्र शूकशुकाट पाहायला मिळत आहे, सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत.  कराड समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान उद्या  हत्येच्या गुन्ह्यात कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे.  कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.  संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून सातत्यानं वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.  अखेर त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;