Shivsena : ‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’…बड्या नेत्याचाच उद्धव सेनेला घरचा आहेर, व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये अजून काय काय?

Shivsena : ‘शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झालीय’…बड्या नेत्याचाच उद्धव सेनेला घरचा आहेर, व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये अजून काय काय?

शिवसेनाची दोन शकलं पडली. राज्यात एक गट महाविकास आघडीसोबत तर दुसरा महायुतीसोबत सत्तेत गेला. लोकसभेत अभूतपूर्व असा विजय आणि विधानसभेत दारूण पराभवाने उद्धव ठाकरे गटाला आता मुंबई महापालिकेतील सत्ताकेंद्र हातचे जाणे धोक्याचे ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून कोणी ना कोणी पदाधिकारी, नेता नाराजीच्या चर्चा समोर येत आहे. त्यातच कोकणातील या नेत्याने तर आता पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आता जवळ जवळ काँग्रेस झाली आहे, असा आरसाच या बड्या नेत्याने दाखवल्याने खरी गोची झाली आहे.

भास्कर जाधव यांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल

चिपळूण येथे कार्यकर्ता बैठक झाली. या बैठकीत भास्कर जाधव यांनी धुवाधार बॅटिंग केली. त्यांनी पक्षातील मरगळीवर थेट निशाणा साधला. त्यांचा या बैठकीतील एक ऑडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचे दिसून येते. तर पक्षाच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी स्पष्ट मांडल्याचे दिसून येते.

शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे, असे खडेबोल पदाधिकार्‍यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी सुनावले. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्‍याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला.

पदाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांची नाराजी

शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला त्यांनी विनायक राऊत यांना दिला. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखा पासून सर्वांच्या नावाने फतवे काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या कार्य पद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जुन्या शिवसैनिकांना कोण पुसतो?

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, असा नाराजीचा सूर सुद्धा भास्कर जाधव यांनी आवळला. चिपळूणमधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली. पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. या बैठकीला सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम यांचीही हजेरी होती.

जबाबदारीने काम करायला पाहिजे

पक्ष कठीण काळातून जात असताना नेत्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटतेच असे नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्या या भाषणावर दिली आहे. पण आता पक्षातूनच आवाज उठत असल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;