मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर काही तांत्रिक कारणामुळे सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. त्यामुळे कल्याणहून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेला मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. धुकं, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि तांत्रिक कारणांमुळे कसारा-कर्जतहून कल्याणकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी कसारा-कर्जतहून सीएसएमटी आणि कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे.

यामुळे कल्याण-सीएसएमटीकडे जाणारी स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मोठा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. कर्जत, कसारा, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण यांसह अनेक स्थानकावर पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;