‘आका’ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा

‘आका’ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तपासावर बोट ठेवत, सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या धोरणावर आसूड ओढले.

‘आका’वर मोका नाही

वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आता सात आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. त्यात वाल्मीक कराडचे नाव नाही. यासंबंधी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला असा घणाघात राऊतांनी केला.

हीच तर भाजपाची कामाची तऱ्हा

मुख्य आरोपीला सोडून इतरांना मोका लावण्यात आला आहे, असे सांगत त्यांनी भाजपाला चांगलेच सुनावले. हीच भाजपाची राज्य करण्याची पद्धत असल्याचे ते म्हणाले. मुख्य आका तसाच कायम ठेवायचा आणि त्याच्या खालची जी माणसं आहेत. त्यांच्यावर कारवाई करायची. बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात जे घडलं आहे. ते अत्यंत धक्कादायक आहे. आपण सामनामध्ये याविषयी भाष्य केल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री वारंवार न्याय आणि सत्य याची भाषा करतात. कोणाला सोडणार नाही, खपवून घेणार नाही, असं सांगतात. पण त्यांनी खपवून घेतलेले अनेक नेते आणि लोकं त्यांच्या बाजूलाच बसल्याचा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला.

वाल्मीक कराड काही दिवसात बाहेर येईल

पण मुख्यमंत्र्यांनी वाल्मीक कराड याला खपवून घेतले आहे, असा चिमटा राऊतांनी काढला. जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत. जो मोठा मासा जाळ्यात अडकून ठेवला आहे. तो वाल्मीक कराड येत्या काही दिवसात बाहेर येईल. त्याच्यावर साधा खंडणीचा गुन्हा दाखल आहे. इतर कोणता गुन्हा आहे? असा सवाल करत त्यांनी कोण कोणाला वाचवत आहे, ते दिसत असल्याचे सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;