एसटी कुठवर आली, आता तुमच्या मोबाईलवर पाहा, नवीन वर्षात महामंडळाचं प्रवाशांना गिफ्ट

एसटी कुठवर आली, आता तुमच्या मोबाईलवर पाहा, नवीन वर्षात महामंडळाचं प्रवाशांना गिफ्ट

ग्रामीण भागात एसटीही दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते. पण एसटी अनेकदा वेळ हुकवत असल्याने प्रवासी ताटकळतात. त्यांना एसटीची वाट पाहत थांबावे लागते. आता तर विविध योजनांमुळे जाईन तर एसटीनेच, असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवासी धरतात. त्यांच्यासाठी आता परिवहन महामंडळाने नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिले आहे. आता एसटी बस कुठंपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे.

एसटी महामंडळाचे राज्यभर जाळे

एसटी महामंडळाचे राज्यभर जाळे पसरलेले आहे. 50 हजार मार्गावर जवळपास सव्वालाख फेऱ्या होतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांना वेळेवर पोहचूनही एसटीची वाट पाहावी लागते. त्यांना एसटी किती वेळात येणार, आता बस कुठे आहे, याची कोणतीही माहिती मिळत नाही. मग प्रवाशांचा त्रागा वाढतो. यावर आता एसटी महामंडळाने तोडगा काढला आहे.

व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप आणले आहे. VLT च्या माध्यमातून प्रवाशांना एसटीचे थांबे, बस स्थानकात बस किती वाजता येणार हे 24 तास अगोदर कळेल. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाईलवर कळेल. त्यासाठी एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून प्रवाशांना बस स्थानकात एसटी किती वाजता येणार हे कळेल. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसेसला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या ॲपच्या माध्यमातून बसची सध्यस्थिती, लोकेशन कळेल.

या सेवेची सुरुवात करण्यासाठी रोस मार्टा कंपनीने रूट मॅपिंग पूर्ण केले आहे. सिस्टिममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण केले आहे. सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल, त्यामध्ये इंटिग्रेट करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढल्यावर त्यावरील ट्रिप कोड, एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन प्रवाशांना समजेल. मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात त्यासाठी अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;