Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच महाविकास आघाडीत वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उट्टे काढले. कालपासून आघाडीतील बिघाडी ही सत्ताधाऱ्यांना आनंदाचा उकळ्या फुटण्याचा कार्यक्रम झाला आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. इतकेच नाही तर त्यांनी INDIA आघाडीवरून मोठा इशारा पण दिला.

कशावरून उफळला वाद?

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेला जागा वाटपात जो घोळ घालण्यात आला, त्यावर नेमकं बोट ठेवलं. जागा वाटप दोन दिवसांत झाले असते तर निदान उर्वरीत दिवस प्रचारासाठी मिळाले असते. जागा वाटप ताणल्या गेल्यानेच विधानसभेसाठी कोणतेही नियोजन करता आले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यांनी या विलंबासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. त्यांनी नियोजनाचा अभाव, बैठकीला उशीर आणि इतर कारणांचा पाढाच वाचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेसला सुनावले खडे बोल

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्स जिवंत ठेवण्याची काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसने बैठक घ्यायला हवी होती. त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायला हवं होतं. पण एकही बैठक घेतली नाही. इंडिया अलायन्सचं अस्तित्व राहिलं नाही, असं लोकांना वाटत असेल तर ही काँग्रेसची जबाबदारी आहे. इंडिया अलायन्समध्ये संवाद राहिलेला नाही, असे एकामागून एक घणाघात त्यांनी काँग्रेसवर घातले.

काँग्रेसला दिला मोठा इशारा

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने इंडिया अलायन्सची जबाबदारी घेणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही आमचे मार्ग निवडून घेऊ. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. आता तिचं अस्तित्व नाही, असं काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी तसं अधिकृतपणे जाहीर करावं. तुम्हाला सांगतो, जर इंडिया अलायन्स एकदा फुटला तर पुन्हा इंडिया अलायन्स बनणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. ही भूमिका एखाद्या पार्टीची असेल तर ती मोठी पार्टी आहे. तुम्ही असं विधान करण्यापूर्वी विचार करा, असे त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;