‘महिला आयोगावर कचकड्या भावल्या बसवल्यामुळं…’ पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून अंधारेंचा चाकणकरांना टोला

‘महिला आयोगावर कचकड्या भावल्या बसवल्यामुळं…’ पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून अंधारेंचा चाकणकरांना टोला

पुण्यामध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या तरुणीच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाकडूनच या तरुणीवर हल्ला करण्यात आला. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे, त्यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. वारंवार कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्या वरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे, असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

त्यांच्याकडून फार गांभीर्याने काही गोष्टी केल्या जातील ही अपेक्षा व्यर्थ आहे. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तरुणीची हत्या करण्यात आली, त्यामुळे वारंवार कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.  या सगळ्या वरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. महिला आयोगावर कचकड्याच्या भावल्या बसवल्यामुळे त्यांच्याकडून फार गांभीर्याने काही गोष्टी केल्या जातील ही अपेक्षा व्यर्थ आहे, असा टोलाही यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर यांना लगावला आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्यामध्ये बुधवारी एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे, तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणानं तीची हत्या केली.  शुभदा कोदारे  असं या तरुणीच नाव आहे. तर कृष्णा कनोजा असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. वडील आजारी असल्याचं खोट सांगून या तरुणीने या तरुणाकडून पैसे घेतले होते. मात्र तिचे वडील आजारी नसल्याचं जेव्हा या तरुणाला कळलं तेव्हा त्याने या तरुणीकडे पैसे वापस देण्याचा तगादा लावला. यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;