जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय?

जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय?

मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी देखील काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी  जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करावी अशी देखील मागणी केली आहे.

शरद पवारांसमोरच कोंडी 

या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित होते.  या बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच जंयत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून बदली करावी अशी मागणी देखील काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. शरद पवार यांच्यासमोरच पादाधिकाऱ्यांनी अशी मागणी केल्यामुळे जयंत पाटील यांची शरद पवार यांच्यासमोरच कोंडी झाली.

दरम्यान यावर आता जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजुला होतो. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बोलणं सोप्प असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं. बूथवर काय काम केलं याचा डेटा द्या. सभागृहामध्ये सध्या जेवढे लोक बसले आहेत, त्यांनी निवडणुकीत काय काम केलं त्याचा डेटा पक्ष कार्यालयात जमा करावा, त्यानंतर  आठ दिवसांमध्ये पद सोडण्यावर निर्णय घेतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार आणि रोहित पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणी 

दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;