मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर, घरात घुसून शूटिंग

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर, घरात घुसून शूटिंग

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना  पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे.

आव्हाडांचा संताप 

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले, त्यांच्याकडून चित्रिकरण देखील करण्यात आलं. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच आव्हाड भडकले.  पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? आसा सवाल आव्हाडांकडून पोलिसांना करण्यात आला आहे. सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान  यावेळी आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील फोन केला.  जोपर्यंत वरिष्ठ पोलीस इथे येत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय विभागाचे पोलीस तिथे पोहोचले, ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. यावरून आता आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;