कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय, उज्वल निकम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय, उज्वल निकम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

कल्याणमध्ये आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला, बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. 23 डिसेंबर रोजी या अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आता हा खटला ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.

या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लक्ष घातलं आहे.या प्रकरणात तातडीनं कारवाई केली जाईल. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे हा खटला लढवतील. ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी आहे. तिला न्याय मिळून देणं माझी जबाबदारी आहे. चार महिन्यांच्या आत आरोपीला कठोर शिक्षा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं आहे.

शनिवारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे. सर्वतोपरी सहकार्य करू, आरोपीला चार महिन्यांच्या आत शिक्षा होईल असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला दिलं आहे. तसेच पीडित कुटुंबाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करा असे आदेश देखील फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आता या खटल्याचं काम ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे पाहाणार आहेत. तसेच या प्रकरणात  30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. आरोपीला चार महिन्यांच्या आत शिक्षा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;