तळीरामांना मोठा धक्का; आता थर्टीफस्टला मिळणार फक्त एवढीच दारू, नव्या गाईडलाईन्स जारी

तळीरामांना मोठा धक्का; आता थर्टीफस्टला मिळणार फक्त एवढीच दारू, नव्या गाईडलाईन्स जारी

नवं वर्ष सुरू होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नव वर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केलं आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पार्टीचं आयोजन केलं आहे. काही जण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घरीच नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. तर काही जण मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात आहेत. नव्या वर्षाच्या स्वागताला हॉटेल आणि रिसॉर्ट्समध्ये जाणं हे आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र ज्यांना हॉटेल आणि बारमध्ये जाऊन नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काही नियमांत बदल करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पॅक एवढीच दारू मिळणार आहे. चार पॅकपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाहीये. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.

चालकाची व्यवस्था करणार

सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे, कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी, त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;