मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…

मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत. या व्हिडीओमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात. अंजली दमानिया यांनी मुंडेंचा एक व्हिडीओ जो ट्विट केला आहे, त्यामध्ये मुंंडेंच्या हातात पिस्तूल दिसत आहे.  ‘हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा’ असं कॅप्शन देखील दमानिया यांनी या व्हिडीओ दिलं आहे.

दोन व्हिडीओ ट्विट 

दरम्यान दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवताना दिसत आहेत, तर त्यांच्या शाजारी वाल्मिक कराड बसलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच कारमध्ये बसल्याचा आणि मुंडे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ दमानिया यांनी ट्विट केला आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल दिसत आहे.  हे दोन व्हिडीओ ट्विट करून  ‘हे असले बॉस ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान अंजली दमानिया यांनी हे ट्विट करतानाच ‘ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;