Mumbai AQI Today : असं काय घडलं? मुंबई पाकिस्तानपेक्षा मागे का?

Mumbai AQI Today : असं काय घडलं? मुंबई पाकिस्तानपेक्षा मागे का?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालवली आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक झाली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे आता मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज 139 इतका नोंदवण्यात आला आहे. हा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत येतो. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई शहरातील तापमान कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात आले आहे.

तुमच्या शहरातील स्थिती काय?

मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता धोकादायक स्थितीत आहे. या ठिकाणच्या हवेचा निर्देशांक 200 ते 300 या दरम्यान आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. मुंबईत सातत्याने होणारे वातावरणातील बदल आणि बांधकामे यामुळे मुंबईतील हवेवर सातत्याने परिणाम होत आहे. सध्या मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईकर चिंतेत आहेत.

पाकिस्तानपेक्षा मुंबईतील हवा खालवली

हवेचा गुणवत्ता निर्देशांक दर्शवणाऱ्या https://www.aqi.in/ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील हवा 212 AQI इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची नोंद करण्यात आली आहे. या यादीत मुंबईचा क्रमांक 69 वर आला आहे. विशेष बाब म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक हा 72 इतका आहे. याचाच अर्थ मुंबईपेक्षा पाकिस्तानातील हवा शुद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;