Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कोणती खाती? अजित पवार यांच्या वाटेला काय आले?
Shiv Sena Portfolio Distribution : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधानसभा निवडणूक निकालानंतर अखेर महिन्याभराने झाला. या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही महत्वाची खाती आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क हे खाती आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही किरकोळ बदल वगळता मागील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारी खाती दिली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम आहे. या खात्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्याचा फायदा त्यांना शिवसेनेत बंड करताना झाला होता. गृहविभाग सोडला तर गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही महत्वाची खाती शिंदे यांना मिळाली आहे. गृहनिर्माण सारखे पॉवरफुल खाते एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून आपल्याकडे घेतले आहे. यापूर्वी हे खाते शिंदे सरकारमध्ये भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे होते.
शिवसेनेकडे कोणती खाती
- एकनाथ शिंदें- नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
- उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
- प्रताप सरनाईक – वाहतूक
- शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
- भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
- प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
- दादा भुसे – शालेय शिक्षण
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
- संजय राठोड – मृदा व जलसंधारण
- संजय शिरसाट – सामाजिक न्याय
शिवसेनेचे राज्यमंत्री
- योगश कदम – ग्रामविकास, पंचायत राज
- आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला काय आले?
- उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन शुल्क
- हसन मुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण
- अदिती तटकरे -महिला व बालकल्याण
- धनंजय मुंडे – अन्न नागरी पुरवठा खाते
- बाबासाहेब पाटील – सहकार
- मकरंद पाटील – मदत व पुनर्वस खाते
- दत्ता मामा भरणे -क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक
- कृषी – माणिकराव कोकाटे
- अन्न व औषध प्रशासन – नरहरी झिरवाळ
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List