‘त्या’ लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई? लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

‘त्या’ लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई? लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतता. या वर्षी जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हापते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान आता डिसेंबरचा हापता खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला होता. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1 हजार 500 रुपयांऐवजी दोन हजार 100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती, तर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना माहिती दिली. आम्ही जी जी आश्वासन दिली तीती आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याबद्दल कोणी मनात शंका ठेवण्याचं कारण नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की, ही योजना चालूच राहणार आहे. कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही, मात्र काही काही जणींनी या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती उघडल्याचं आढळून आलं आहे. तसेच काही ठिकाणी तर  पुरुषांनीच खाती काढली आहेत, मग अशांना लाडका भाऊ म्हणायचं का? लाडका भाऊ सुद्ध म्हणता येणार नाही, कारण त्याची आपल्या बहिणींच्या पैशांवर नजर आहे. शेवटी पैसा जनतेचा आहे. दरम्यान फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या या माहितीनंतर आता ज्यांची दोन खाती आहेत. किवा ज्या महिला चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत,  अशा महिलांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;