भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना जोरदार चोपले
काँग्रेस आणि भाजपमध्ये संसदेत राज्यघटनेवरुन सुरु असलेल्या प्रकरणाचे पडसाद मुंबईत उतरले. मुंबईत भाजयु मोर्चाने काँग्रेस विरोधात आंदोलन केले. अचानक मुंबईतील काँग्रेस कार्यालयात पोहचत तोडफोड केली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेस कार्यालयात सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे असलेल्या फोटोंवर शाई फेकली. तसेच कार्यालयातील खुर्च्या आणि इतर साहित्यांची तोडफोड केली.
भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी कार्यालायाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना जोरदार लाठीचार्ज केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List