78 वर्षांपूर्वी मुंबई समुद्रात अशीच दूर्घटना; 40 फुटांची लाट अन् 600 प्रवाशांसह बोट बुडाली  

78 वर्षांपूर्वी मुंबई समुद्रात अशीच दूर्घटना; 40 फुटांची लाट अन् 600 प्रवाशांसह बोट बुडाली  

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. पण नीलकमल बोट बुडाल्याची ही पहिलीच घटना नाही. 78 वर्षांपूर्वीदेखील मुंबईत यापेक्षाही भयानक दुर्घटना घडली होती.

78 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशीच दूर्घटना

78 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशीच एक दूर्घटना घडली होती. या घटनेट चक्क तब्बल 600 पेक्षा जास्त प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. ही घटना घडली होती भाऊच्या धक्क्यावर. भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी निघालेल्या ‘एमएस रामदास’ ही बोट बुडाली होती. या दुर्घटनेत 600 पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

1947 साली भारत स्वातंत्र्य होण्याआधीच महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 17 जुलै 1947 साली सकाळी 8 वाजता मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी एमएस रामदास निघाली खरी मात्र त्याआधीच बोटीला जलसमाधी मिळाली. मुंबई बंदरापासून 7.5 किमी अंतर बोटीने कापले होते त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. बोट वेगाने पुढे जात होती त्याचवेळी सोसाट्याचा वारा आणि उसळलेल्या लाटांमुळे बोट काशाच्या खडकांजवळ कलली.

महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडलं

बोट खडकाजवळ उलटल्यानंतर हळूहळू बोटीत पाणी भरू लागलं. बोटीत पाणी शिरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. यावेळी बोटीमध्ये लाइफ जॅकेटची संख्याही कमी होती. त्याचवेळी रामदास जहाज गल्स दीपजवळ पोहोचले आणि नेमकं त्याचवेळी आलेल्या महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडलं, त्यामुळे पाणी जहाजात पूर्णपणे शिरले. ज्या प्रवाशांना पोहता येत होतं त्यांनी पटापट समुद्रात उडी घेत जीव वाचवला तर काही जण अडकून पडले. सकाळी 9च्या सुमारास पूर्ण जहाजच समुद्रात बुडालं.

10 वर्षाच्या मुलामुळे दुर्घटनेची माहिती 

साधारणतः मुंबईहून रेवासला पोहोचण्यासाठी 1.30 तासांचा अवधी लागतो. मात्र, जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी 5पर्यंत कोणालाही नव्हती. बारक्या मुकादम या 10 वर्षांच्या मुलाने मोठ्या हिंमतीनं कसाबसा मुंबईचा किनारा गाठला तेव्हा मुंबईतील या सर्वात मोठ्या दुर्घटनेची माहिती सर्वांना मिळू शकली. त्यानंतर कंपनीने दोन बोटी प्रवाशांच्या मदतीसाठी पाठवल्या होत्या. मात्र तोपर्यंत सर्व संपलं होतं. 630 जणांना या घटनेत जलसमाधी मिळाली होती तर 60 ते 70 जणांचा जीव वाचला होता.

रेवस येथील कोळीबांधवानी काही जणांना वाचवून किनाऱ्यावर आणले होते. कोळीबांधवानी हजारो रुपयांची मासळी समुद्रात फेकून बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवून रेवस बंदरावर पोहोचवलं. बोटीचा कॅप्टन यासह बरेच खलाशी यांचाही जीव वाचला होता. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर वाहात आले होते.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;