बेस्टच्या ताफ्यात नवीन 1300 बसेस, कामगार संघटनेने दिली महत्वाचा सल्ला

बेस्टच्या ताफ्यात नवीन 1300 बसेस, कामगार संघटनेने दिली महत्वाचा सल्ला

Best Bus: मुंबईत काही दिवसांपूर्वी बेस्ट बसचा अपघात झाला होता. या अपघात सात जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातावर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघाता़ची घटना गंभीर आहे. राज्य शासनाने त्याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. तसेच. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्या बसेस लवकरच ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेत सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1300 बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत म्हणाले, बेस्टच्या बसेस बंद पडणे तसेच इतर कारणांसाठी मागील ८ महिन्यांत आयुक्तांना भेटण्यासाठी १२ पत्रे दिली. त्यात कुर्ला अपघातामुळे डोक्याहून पाणी गेले. ड्रायव्हर दारू घेण्यासाठी बसेस थांबतात, असा व्हिडिओ आला. आता १३०० गाड्या नवीन येणार आहे. परंतु या गाड्या चालवण्यासाठी भाड्याने देऊ नका, असे सुहास सामंत यांनी म्हटले.

बसेस भाड्याने देऊ नका…

सरकार नवीन बसेससाठी मोठा पैसा खर्च करते. परंतु त्या भाड्याने देतात. त्यामुळे त्यांची मालकी होते. तसेच बसेस चालवण्यासाठी रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर बोलावतात, असा आरोप सुहास सामंत यांनी केला. बसेसमध्ये कोंबून लोक भरलेले असतात. त्यामुळे अपघात होतात. बेस्टची सार्वजनिक जबाबदारी ही देखील महापालिकेची आहे.

अनेक छोट्या बसेस धूळखात पडल्या आहेत? त्या बसेस फेल गेलेल्या आहेत. नको त्या कंपन्यांच्या गाड्या आणल्या गेल्या. त्या फेल गेल्या आहेत. त्याच्यावर बेस्टच्या लोगो असल्याने बेस्टची नाचक्की होत आहे, असे बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;