‘मी नसल्याने काही फरक पडत नाही’, मंत्रिपद हुकल्यानंतर दीपक केसरकर बोलून गेले

‘मी नसल्याने काही फरक पडत नाही’, मंत्रिपद हुकल्यानंतर दीपक केसरकर बोलून गेले

आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची संधी हुकली आहे. मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर त्यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते, त्यावेळी बोलत होते.  शपथविधी हा मंत्र्यांचा असतो, अधिवेशन हे आमदारांसाठी असते. उद्या सकाळपासून अधिवेशन सुरू होणार असून, मला सकाळी अधिवेशनसाठी जायचं आहे. त्याअगोदर मी साईदरबारी आलोय असं त्यांनी यावेळी म्हटलं.

मंत्रिपदावर प्रतिक्रिया 

दीपक केसरकर यांना यावेळी मंत्रिपद मिळू शकलं नाही, यावर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझी शिंदे साहेबांसोबत जबाबदारीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना एकदाच भेटलो होतो, तेव्हा खूप आमदरांची गर्दी होती. तेव्हा मलाच वाटलं आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा. त्यानंतर मी त्यांना एकदाही भेटलो नाही. मंत्रीमंडळातून डावलने हा काय भाग नसतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय मी घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता, त्याला मराठी भाषा धोरण दिलं. मी जे काही केलं त्यात मी समाधानी आहे. साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात.

मी अधीवेशनाला जाण्याअगोदर साईबाबांचे दर्शन घेत असतो. मी मंत्रिमंडळात असतो तर काल साईबाबांचे दर्शन घेऊन आज नागपूर विधानभवन येथे स्पेशल विमानाने गेलो असतो. मी नसल्यामुळे त्या ठिकाणी फार फरक पडत नाही. आमच्या विभागातील पदाधिकाऱ्यांना भेटून मी अभिनंदन केलं आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे एक फायटर नेते आहेत, परिस्थितीशी झुंज देत काम करण्याची क्षमता ते सिद्ध करत असतात. खरी शिवसेना कुणाची याचं योग्य उत्तर एकनाथ शिंदे यांनी जनतेकडून घेतलं आहे.   एकनाथ शिंदे यांच्यात जे गुण आहेत ते एक शिवसैनिकाचे गुण आहेत.  हे त्यांनी महाराष्ट्राला दाखऊन दिलं आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;