जालनात एसटी बस आणि भरधाव टेम्पो ट्रकची ध़डक, 2 जणांचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी

जालनात एसटी बस आणि भरधाव टेम्पो ट्रकची ध़डक, 2 जणांचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी

प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस आणि भरधाव टेम्पो ट्रकची धडक झाल्याने भीषण अपघात होऊन जालन्याच्या नाव्हा शिवारामध्ये दोन ते तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेतील ट्रेम्पो ट्रक चालक मद्य पिऊन वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून ही बस माहुरगडकडे येताना टेम्पोने पुढील एसटीच्या पुढच्या बाजूस धडक दिल्याने एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेदा झाला आहे.

एसटी महामंडळाच्या एका बसचा जालना येथील नाव्हा शिवारामध्ये येथे टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. ही ट्रकची धडक इतकी भीषण होती की एसटी महामंडळाच्या बसचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन – तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. ही एसटी बस जालन्याकडून मेहकरच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेहकरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो ट्रकने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या पुढी भागात बसलेल्या दोन ते तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांकडून मदत कार्य सुरू आहे.

डंपरने ठोकरल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू

डंपरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील हातखंबा येथे रात्री घडली आहे. या अपघातात उच्च शिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर काम करणाऱ्या इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने पाठीमागून दुचाकीस्वाराला दिली धडक दिल्याने शिशिर रावणंग या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण रत्नागिरीतल्या निवळी येथील असून त्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.डंपर चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांची दिली आहे.

यंत्रमाग कारखान्यात महिला कामगाराचा मृत्यू

इचलकरंजी यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना इचलकरंजी घडली आहे. इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून शालन मारुती पवार (वय 62 रा. बाळनगर) या वृध्देचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाणे पुढील तपास करीत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;