कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर मशीद की मंदिर, कोर्टाने नेमका काय दिला निर्णय?

कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर मशीद की मंदिर, कोर्टाने नेमका काय दिला निर्णय?

Durgadi Killa: कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण न्यायालयाचा निकाल 48 वर्षांनी आला आहे. या किल्ल्यावर मशीद की मंदिर आहे, असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही. परंतु ती जागा शासनाची असल्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाचा आदेश येताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेने दुर्गाडी किल्ल्यावर जात आरती केली. यानंतर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

यामुळे फेटाळला दावा

दुर्गाडी किल्ल्याबाबत न्यायालयाचा आज निकाल लागला आहे. याबाबत सरकारी वकील सचिन देशपांडे यांनी सांगितले की, न्यायालयात जो दावा दाखल होता, तो मुदतबाह्य आहे. म्हणून न्यायालयाने फेटाळलेला आहे. शासन या जागेचा मालक आहे. 1966 साली या जागेचा ताबा शासनाने घेतला होता. त्यानंतर 1976 साली दावा काही संघटनेकडून या जागेवर दावा दाखल करण्यात आला होता. मात्र दावा हा मुदतीत दाखल न केल्याने हा दावा फेटाळलेला आहे. यामुळे शासनाची मालकी या जागेवरती आहे हे सिद्ध झाले.

मुस्लीम धर्माचा दावा

1976 साली मजलिश मुशाहील या संघटनेकडून दुर्गाडी किल्ल्याची जागा मुस्लीम धर्माच्या ईदगा ,मज्जित यांच्या मालकीची असल्याचा दावा करत त्यांची मालकी घोषित करावी, असा दावा न्यायालयात केला होता.
मात्र हिंदू संघटनेचे वकील आणि शासनामार्फत सचिन देशपांडे आणि इतर वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशात आले की हा दावा मुदतीत नाही. त्यामुळे हा दावा मुदतीत नाही. म्हणून निकाली काढला. मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता दुरुस्ती करण्याची आता शासनाला पूर्णपणे अधिकार आहे.

शासनाची मालकी सिद्ध

जागा ही शासनाच्या मालकीची आहे. मंदिर व मशीद बाबत कुठलाही निर्णय न्यायालयाने दिला नाही. मात्र संघटनेने ही जागा मशीद आहे, असा दावा केला होता. न्यायालयाने हा दावा निकाली आणल्याने तो देखील संपुष्टात आणलेला आहे. दरम्यान, हिंदू संघटनांनी हा निर्णय आपल्या बाजूने लागल्याचा दावा केला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला शासनाचा असल्याची आमची भूमिका होती, असे हिंदू संघटनेतर्फे सांगण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;