लाडक्या बहिनींना गुडन्यूज, डिसेंबरच्या हफत्याची तारीख अखेर समोर, या दिवसी खात्यात जमा होणार पैसे

लाडक्या बहिनींना गुडन्यूज, डिसेंबरच्या हफत्याची तारीख अखेर समोर, या दिवसी खात्यात जमा होणार पैसे

ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती.  जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आला होता. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते.

त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.  याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुले किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाणणी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे. त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;