जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?

जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद काबंळी याचा वाईट काळ सुरु झाला आहे. एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज विकलांग अवस्थेत जगत आहे. सचिनचा जिवलग मित्र असलेल्या विनोदला एकेकाळी सचिन सारखेच पैसा, प्रसिद्धी आणि सुखसुविधा मिळाल्या होत्या. परंतू आता परिस्थिती उलट झाली आहे. त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीए न त्याच्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पैसा उरला आहे. त्याला अनेक आजार झाले आहेत. आता तो केवळ बीसीसीआयच्या पेन्शनवर दिवस ढकलत आहे. या दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद याच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे.

अमित शाह यांनी विनोद कांबळीबद्दल काय सांगितले ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद कांबळी याचा एक किस्सा सांगितला आहे. अमित शाह यांनी सांगितले की चेन्नईत एका क्रिकेट कार्यक्रमात आपली भेट विनोद कांबळी याच्याशी झाली. तेव्हा विनोद कांबळी निवृत्त झालेले होते. परंतू एकेकाळी ते चांगले बॅट्समन म्हटले जायचे. तेव्हा आपली विनोद यांना विचारले की तुमच्या जीवनाच्या या चढउतार तुम्ही सर्वात आनंदी केव्हा होता ? तो काळ मला सागा ? मला वाटले की ते सांगतील की डबल सेच्युरी मारली तेव्हा. परंतू त्यांनी मला सांगितले की, ‘ सर मी अनेक खेळाडूंना हरवले आहे. आम्ही जिंकलो आणि अनेक रेकॉर्ड तोडले. परंतू आजही मला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो. जेव्हा मी कुठल्या युवा खेळाडूला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.’

विनोद कांबळी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतासाठी १०० हून अधिक एक दिवसीय सामने खेळलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विनोद हा लहानपणीचा मित्र आहे. एकेकाळी दोघांची मैत्री खूपच प्रसिद्ध होती. एकीकडे सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. दुसरीकडे विनोद कांबळी खूप काळापासून एकांत जीवन जगण्यास मजबूर आहेत. या दरम्यान, अमित शाह यांनी विनोद कांबळी सोबत झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

कांबळीने याने १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळला

विनोद कांबळी याने भारतासाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळला आहे. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना साल १९९५ मध्ये खेळला होता. तर ५० षटकाचा शेवटचा वनडे सामना साल २००० मध्ये खेळला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;