तुरुंगात टाकण्यापूर्वी माझ्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट; दाव्याने खळबळ

तुरुंगात टाकण्यापूर्वी माझ्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट; दाव्याने खळबळ

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगात टाकण्यापूर्वी आपल्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता. आपण त्या दबावाला बळी पडलो नाही, त्यामुळे आपल्या तुरुंगात जावे लागले. दुसरीकडे अजित पवार, प्रुफल्ल पटेल यांनी सोयीनुसार भूमिका बदलली. त्याचा फायदा त्यांना आता मिळत आहे. आता नवाब मलिक यांचीही संपत्ती त्यांना परत मिळेल, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त केली. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट मिळाली. नवाब मलिक यांनाही क्लीन चिट मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांची ३०० कोटींची संपत्ती जप्त केली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिमसंदर्भात आरोप होता. त्या सर्व दबावांमुळे ते भाजपसोबत गेले. माझ्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दाबाव आणला गेला होता. मला तुरुंगात टाकण्यापूर्वी पक्ष सोडण्याचे सांगितले गेले होते. परंतु मी शिवसेनेसोबत राहिला. त्यामुळे मला तुरुंगात टाकले गेले. माझे राहते घर जप्त केले. मराठी माणसाचे राहते घर मुंबईत किती असणार? ते ही ईडीच्या ताब्यात आहे. माझी गावाकडची वंशपरंपराने मिळालेली जमीन ताब्यात घेतली.

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी

राज्यभरातून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. परंतु निवडणूक आयोग डोळ्यावर झापडे लावून बसले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार वर्षांपासून निर्णय होत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेऊ नका, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयावर केली.

संजय राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, मी दादांचे अभिनंदन करतो. त्यांच्यावर सुरु झालेल्या कारवाईनंतर अस्वस्थ झाले होते. ते तणावाखाली आले होते. त्यांची हजारो कोटींची प्रॉपर्टी जप्त केली गेली होती. परंतु त्यांनी पक्ष सोडला आणि सर्व तणाव त्यांचा गेला. त्यासाठी त्यांना वडिलासमान काकांच्या पाठित खंजीर खुपसावा लागला, असे राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;