रविवारी फिरायला बाहेर पडायचा प्लान ? आधी हे वाचाच… मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कसं असेल शेड्युल ?

रविवारी फिरायला बाहेर पडायचा प्लान ? आधी हे वाचाच… मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कसं असेल शेड्युल ?

विवारच्या सुट्टीची संधी साधून बरेच मुंबईकर बाहेर फिरायला किंवा समारंभासाठी बाहेर पडत असतात. तुमचाही उद्या हाच प्लान आहे का ? मग आधा हे थांबा, हे वाचा आणि मगच तुमचा प्रवास प्लान करा. अहो का काय विचारताय ? दिवसरात्र वेगाने धावणारी, लाखो मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी, मुंबईकरांची लाईफलाइन अशी ख्याती असलेल्या रेल्वेवर, तेही मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे ना. त्यामुळेच उद्या कुठे, कधी, कोणत्या मार्गावर , किती वेळासाठी ब्लॉक असणार आहे याची सगळी माहिती वाचा आणि मगच… प्रवास करा.

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या, रविवार 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत वाजेपर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ( सीएटृसएमटी) सुटणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, या लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील.

तर हार्बर मार्गावरही कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते 4.40 वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर ब्लॉक असेल.

कोकण रेल्वेवर दोन दिवसीय ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी देखील आज आणिउद्या अर्थात 7 व 8 डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. करमळी-वेर्णा स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असून या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड-तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेच्या करमळी-वेर्णा विभागात 7 डिसेंबर रोजी दुपारी 4.10 ते संध्याकाळी 5.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावणार आहेत अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;