मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारताच फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन; म्हणाले, धारावीत…

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारताच फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन; म्हणाले, धारावीत…

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहराच्या विकासाबद्दल आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विकासप्रकल्पांवर मत मांडलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींनी ठेवली. जो कुणी विकासक राहिला असता त्याला टीडीआरची मोनोपली करता आली असती. टीडीआरची कॅपींग करा सांगितलं, कुणाकडे किती टीडीआर शिल्लक आहे. त्यातून कुणाला किती विकता येईल हा बदल केला. टेंडरमध्ये अदानी जिंकले. त्यामुळे त्यांना हा प्रकल्प दिला गेला. धारावीतच आपण तिथेच वसवणार आहोत. जे धारावीच्या क्रायटेरीयात बसत नाहीत. त्यांना आपण रेंटल हाऊसींग देणार आहोत. बीडीडी चाळ अर्बन रिनुवलचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, असं फडणवीस म्हणालेत.

2016 साली एक घोषणा केली होती की मुंबईच्या कुठल्याही भागात फक्त 1 तासांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. कोस्टल रोड, वरळी – बांद्रा, वर्सोवा-मढच काम सुरू आहे, जपान सरकार 40 हजार कोटी देणार आहे. आपल्या मुंबईचा 60% ट्रॅफीक कमी होणार आहे. विरार अलीबागच्या कॉरीडोरच काम सुरू केलं आहे. अटल सेतूचं काम झालं आहे. 375 किमीचं मेट्रो नेटवर्क आपण पूर्ण करतोय. सगळं काम होईल, तेव्हा मुंबईकरांचं काम कमी होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मुंबईकरांना जीवनात 3 तास जास्त मिळतील, सबर्बन मेट्रो, बस सिस्टीमच काम करतोय. रोड, फ्लाय ओव्हरच काम मोठ्या प्रमाणात करतोय. बीडीडी चाळ, म्हाडाचे रहिवास,अभ्युदय नगरच काम काम करतोय. बिल्डरांच्या घश्यात घालण्यापेक्षा गृहनिर्माणने आपण काम करतोय. मुंबई बॅंके मार्फत प्रविण दरेकर कर्ज देत आहेत. 3 पट मोठी मुंबई आपण देतोय. विरार पर्यंत परवडणारी घर देता येईल. मुंबईकरांच स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;