विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्लॅन फडणवीस यांनी केला उघड

विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्लॅन फडणवीस यांनी केला उघड

Devendra Fadnavis First Interview after cm: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीचा प्लॅन सांगितला. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळलेल्या मोठ्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकींची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यावर म्हणाले…

निवडणुकांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांचा पक्षालाही झाला आहे. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागत आहे. त्यांनी निवडणुका लढवल्या नाही तर पक्ष कसा चालणार?

विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत तीन मोठे पक्ष होतो. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत मते चांगले मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

या निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात मी कालच वकिलांशी बोललो. या प्रकरणाची याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयने परवानगी दिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्हीएमवर होणाऱ्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा त्यांना आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. ते झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असल्याचे म्हटले जाते. परंतु महाराष्ट्रात पराभव झाला तर  ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;