EVM मध्ये गडबडीचा विरोधकांकडून आरोप, फडणवीसांनी दिलं विलासरावांच्या कुटुंबाचं उदाहरण, म्हणाले…

EVM मध्ये गडबडीचा विरोधकांकडून आरोप, फडणवीसांनी दिलं विलासरावांच्या कुटुंबाचं उदाहरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रालयामध्ये लगेचच मंत्रिमंडळाची बैठकीचं देखील पार पडली. दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच डीडी वाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुढीच पाच वर्ष हे सरकार महाराष्ट्रासाठी कशापद्धतीनं काम करणार याबाबत आपली भूमिका मांडली. सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

लोकसाभ निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र त्यातून सावरत विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळून 50 जागाच जिंकता आल्या. त्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत  आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ईव्हीएमवर मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा आत्मचिंतन केलं पाहिजे. झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली. महाराष्ट्रात ईव्हीएम चांगली नाही. लातूरला धीरज देशमुख हरतात ईव्हीएम चांगली नाही. तर अमित देशमुख जिंकल्यावर ईव्हीएम चांगली आहे. त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर त्यांना चांगल्या जागा मिळतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला अनेकदा ट्रोल केलं गेलं. पण मी ट्रोलर्सचे आभार मानतो. त्यांनी मला सातत्यानं टार्गेट केलं त्यामुळेच लोकांच्या मनात माझ्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. ट्रोलर्स माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं दिसून आलं.  माशी शिंकली तरी ते माझ्याशी असभ्य भाषेत बोलायचे. त्यांनी मला लढण्याची ताकद दिली. लढून यांना हरवायचं आहे. यांना यांची जागा दाखवायची आहे, असं मला वाटलं. त्यांच्या वागण्याने मला मानसिक त्रास नक्कीच झाला, पण मी लढलो त्याचा फायाद मला झाला. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;