पंचायत समिती सदस्य ते सलग सातवेळा आमदार, माजी मंत्री मधुकर पिचड यांचा जीवन परिचय

पंचायत समिती सदस्य ते सलग सातवेळा आमदार, माजी मंत्री मधुकर पिचड यांचा जीवन परिचय

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते. मधुकर पिचड यांनी आदिवासी समाजासाठी मोठं काम केलं. आदिवासी समाजाचे प्रश्न  त्यांनी सातत्यानं विधानसभेत मांडले. ते  सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

मधुकर पिचड यांचा परिचय 

मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 साली महादेव कोळी समाजात झाला. त्यांचं मुळ गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजुर हे आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. पुण्यातील  फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपलं बी ए एल एल बी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी तिथूनच राजकारणाला सुरुवात केली. ते  १९७२ ला अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर  १९७२ ते १९८० पर्यंत ते पंचायत समितीचे सभापती होते. १९८० पासून ते 2009 पर्यंत ते सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले.  १९९५ ते जुलै १९९९ या काळात त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा देखील सांभाळली.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली.  मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे. ते राष्ट्रवादीच्या  स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला त्यांनी अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले.

२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. त्यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;