शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी आता डेडीकेटेड टू कॉमन मॅन

शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी आता डेडीकेटेड टू कॉमन मॅन

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. ते म्हणाले की, मी नाराज नाही. मी माझी भूमिका आधीच जाहीर केली होती. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे. या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या अडीत वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरुन पाठबळ दिलं. यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो. अमित शाह यांना ही धन्यवाद देतो. कारण ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून गेल्या अडीच वर्षाचं कार्यकाळ यशस्वी झाला. इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं.’

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आम्ही ४० आमदार होतो. या निवडणुकीत आता ६० झालो. ही कामाची पोहोचपावती आहे. याचा अभिमान आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं. मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो. आता डीसीएम झालो- डेडीकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईल. मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल अशी भावना व्यक्त करतो.’

मी नाराज नाही, भूमिका आधीच जाहीर केली होती

‘लोकं म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे. पण जनतेने आमच्या सरकारवर मोहर लावली आहे. मी नाराज होतो हे कोणी सांगितलं. मी २७ तारखेलाच भूमिका जाहीर केली होती. गावी गेलो तरी नाराज, तब्येत खराब असली तरी नाराज आहे असे म्हणता. मी कामाला महत्त्व देतो. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ दिला पाहिजे. अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’

‘बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं. त्यांनी विकासाला साथ द्यावी. श्रीकांत शिंदे यांचा उपमुख्यमत्री बनवण्याचा संबंध काय आहे. तो राज्यामध्ये नाहीये. चिंता करु नका. सगळं तुम्हाला कळेल. ‘

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;