Ladki Baheen Yojana : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, डिसेंबरच्या हफत्याबाबत मोठी अपडेट

Ladki Baheen Yojana : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, डिसेंबरच्या हफत्याबाबत मोठी अपडेट

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरी आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजेनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की, आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीनं डिसेंबरचा हाफता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मी पूर्वी जेव्हा सीएम होता तेव्हा मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो, आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वत: डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;