राज्यात 46 वर्षांत 9 उपमुख्यमंत्री पण कोणाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी नाही मिळाली संधी

राज्यात 46 वर्षांत 9 उपमुख्यमंत्री पण कोणाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी नाही मिळाली संधी

Devendra Fadnavis Maharashtra CM: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी शपथ घेत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता अनेक विक्रम होत आहे. तसेच काही मिथक त्यांच्यामुळे तोडले जात आहे. देवेंद्र फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री होत आहे. महाराष्ट्रात तीन वेळा मुख्यमंत्री आतापर्यंत केवळ शरद पवार झाले होते. शरद पवार १९७८,१९९०, १९९३ असे तीन वेळा मुख्यमंत्री झाले. परंतु शरद पवार यांना एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. शरद पवार याच्या देवेंद्र फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री होत आहे.

१९९९ पासून ते आजपर्यंत विधिमंडळात सलग सहा वेळा देवेंद्र फडणवीस आमदार राहिले. त्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्म आहे. संघटनेत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

फडणवीस यांच्या नावावर काय, काय विक्रम

  1. वसंतराव नाईकनंतर सलग पाच वर्ष पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ असा फडणवीस यांचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी होता.
  2. २०१४, २०१९, २०२४ या तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या पक्षाला शंभरापेक्षा जास्त जागा होत्या. परंतु २०१९ मधील शपथविधी काही तासांचा ठरला होता.
  3. महाराष्ट्रात ४६ वर्षांत नऊ उपमुख्यमंत्री झाले. परंतु त्यापैकी कोणालाही पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही. राज्यात उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्तीला मुख्यमंत्री होता येत नाही, असे मिथक तयार झाले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी हा पॅटर्न बदलला. ते उपमुख्यमंत्रीनंतर मुख्यमंत्री झालेले राज्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
  4. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
  5. सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नोंद त्यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये ते केवळ चार दिवसांसाठी मुख्यमंत्री ठरले होते. २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ असा तो काळ होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;