पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना 2022 मध्ये दिले होते आश्वासन, 2024 मध्ये केले पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना 2022 मध्ये दिले होते आश्वासन, 2024 मध्ये केले पूर्ण

Devendra Fadnavis Maharashtra CM: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे सरकार आज अस्तित्वात आले. देवेंद्र फडणवीस 3 सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी आज शपथविधी समारंभ झाला. या बारा दिवसांत अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. परंतु भाजप आता मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते. तसेच 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची संधी मिळाली होती.

काय दिले होते आश्वासन

30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पक्षसंघटनेचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वेळेस सत्तेत आल्यावर फडणवीस यांना सन्मानजनक पद देण्याचे आश्वासन दिले होते.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मन जिंकले होते. त्यामुळे ते दोघांचे जवळचे झाले होते. 2024 मध्ये सत्ता येताच त्यांची पसंत देवेंद्र फडणवीसच होते. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद देण्याबाबत बराच काथ्याकूट झाला. परंतु नरेंद्र मोदी यांची पसंत फडणवीस असल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानिमित्ताने मोदी यांनाही 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची संधी मिळाली.

देवेंद्र फडणवीस पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून राहिले. पक्षश्रेष्ठीच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले. तसेच निवडणुकीत जोरदार प्रचार मोहीम राबवली. त्याचे फळ त्यांना मिळाले. ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी यापूर्वी फक्त शरद पवार यांना मिळाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;