DCM Eknath Shinde: हायव्होल्टेज ड्रामा संपला, उदय सामंत यांनी दिली मोठी बातमी, फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर थेट राज्यपालांकडे

DCM Eknath Shinde: हायव्होल्टेज ड्रामा संपला, उदय सामंत यांनी दिली मोठी बातमी, फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर थेट राज्यपालांकडे

Maharashtra DCM Swearing-in Ceremony: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल म्हणजे महाविकास आघाडीला धक्का तर महायुतीला सुखद धक्का होता. त्यानिकालानंतर गेल्या बारा दिवसांपासून राज्यात राजकीय अनिश्चितता होती. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? हे तब्बल १२ दिवसांनी जाहीर झाले. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सुरु झाल्या. दिल्लीवरुन अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीपासून शपथविधी सोहळ्याच्या दिवसापर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याचे म्हटले जात होते. परंतु शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. शिवसेना नेते उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले. आपण पत्र घेऊन राजभवनात जात असल्याचे त्यांनी म्हटले.

उदय सामंत अन् फडणवीस यांची भेट

शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांच्या भावना त्यांना सांगितल्या. तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कोणताही मंत्री शपथ घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले. त्यानंतर उदय सामंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले. त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

राज्यपालांकडे पत्र घेऊन रवाना

एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना उदय सामंत यांनी दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे पत्र तयार झाले. हे पत्र घेऊन उदय सामंत राजभवनाकडे निघाले. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र देण्यासाठी मी राज्यपालांकडे जात आहे.

उदय सामंत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. ते पक्ष प्रमुख म्हणून काम करणार होते. परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास तयार झाले. दरम्यान, गृहमंत्रीपदाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. गृहमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आता त्यांना भाजप हे पद देणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;