शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज होत आहे. या आधी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण

माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथ विधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शपथ विधी सोहळ्याला उपस्थित रहावं, यासाठी त्यांना निमंत्रित केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना विनंती केली आहे.

फडणवीस सरकारचा आज शपथविधी

आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार अशी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. 11 डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात इतर मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;